आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलातून मुलगी झालेल्या मॉडेलची कहाणी; वडिलांना वस्तुस्थिती कळल्यानंतर धक्का, मिस ट्रान्सक्वीनची नवी कथा

मुंबई | उमेशकुमार उपाध्याय7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कटिहारमध्ये जन्मलेल्या मिस ट्रान्सक्वीनची नवी कथा

कटिहारच्या एका छोट्या गावातील शीख कुटुंबात जन्मलेला नव्या लहानपणी मुलगा होती. १४-१५ व्या वर्षी वर्तणूक मुलीसारखी होतेय असे वाटल्यावर त्याने आईकडे लिंगपरिवर्तन करण्याची इच्छा बोलून दाखवली. कुटुंबाच्या नकारानंतर त्याने जिद्द सोडली नाही. १८ व्या वर्षी तो मावशीकडे आला. येथूनच त्याचा खऱ्या ट्रान्सवुमनचा प्रवास सुरू झाला. मावशीने मला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हार्मोन्स थेरपी घेण्याबाबत चर्चा केली. यानंतर हळूहळू मुलगी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. सध्या ती मिस ट्रान्सक्वीन इंडिया ब्यूटी पेजेंटची ब्रँड अॅम्बेसेडर, अॅक्टर आणि मॉडेल आहे. त्याने एक बायोपिक चित्रपट केला आहे. हा चित्रपट कस्टम अधिकारी अॅन्सन थॉमसवर असून त्याचे नाव प्लीज टु प्रोजेक्ट आहे. नव्याने आपली कथा भास्करला सांगितली. पप्पा या गोष्टीबाबत समाधानी नव्हते, मात्र म्हणतात ना काही विधिलिखित असते.मी पप्पांना घेऊन मुंबईला आले व डॉक्टरांकडून तपासणी केली. आई-वडिलांचे समुपदेशन झाले. काही वेळाने डॉक्टरांच्या खोलीतून पप्पा बाहेर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू होते. ते मिठी मारत म्हणाले, तुम्ही स्वत:च्या हिमतीवर आयुष्याचा लढा देता तेव्हा तोच सर्वात कठीण काळ असतो

घरी आल्यानंतर सर्व नवरीप्रमाणे पाहत होते.

माझे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर घरी आले तेव्हा मला पाहण्यासाठी खूप लोक आले होते. गावात आलेल्या नव्या नवरीप्रमाणे मला पाहण्यासाठी लोक येत होते तेव्हा मला हसू यायचे. एकेकाळी माझ्याकडे कुणीच पाहत नव्हते. किमान माझे अस्तित्व आहे, याची जाणीव झाली. मी घरात सर्वात मोठी होते. भविष्यात मीच घराची वारसदार असेल, असे वडिलांना वाटत होते. कारण त्या वेळी मी मुलगा होते.

बातम्या आणखी आहेत...