आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मागण्या मान्य झाल्याने नायब तहसीलदारांचा संप अखेर मागे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने वेतनश्रेणीची मागणी मान्य केल्याने गुरुवारी (ता.६) नायब तहसीलदारांनी ३ एप्रिलपासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार नायब तहसीलदारांना ४ हजार ८०० अशी राजपत्रित वर्ग २च्या पदानुसार वेतनश्रेणी मिळणार आहे.

महसूल विभागात नायब तहसीलदार राजपत्रित अधिकारी वर्ग २ हे अत्यंत महत्वाचे पद आहे.मात्र नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग २ चे नसल्याने संघटनेने नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संघटनेने ग्रेड पे ४८०० करण्यासाठी सरकारला याआधी बेमुदत संपाची नोटीसही दिली होती. या नोटिसीची दखल न घेतल्याने नायब तहसीलदारांनी ३ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.

३ एप्रिलपासून कामबंद सुरू होते आंदोलन नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी ४ हजार ८०० रुपये करण्याची मागणी रास्त असल्याचे सांगत विखे पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून वित्त विभागाची मंजुरी घेतली.