आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा भोंगा चालू होता म्हणून 'मविआ'त शिंदेंना मंत्रिपद:अन् 40 आमदारांचे पाठबळही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेला सुनील राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत नावाचा भोंगा चालू होता म्हणूनच महाविकास आघाडी झाली. आघाडी झाली म्हणून एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हे खाते मिळाले नसते आणि हा भोंगा बंद नसता तर ते मुख्यमंत्री झाले नसते आणि चाळीस आमदारही त्यांच्यासोबत गेले नसते. अशी खरमरीत टीका संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी आज माध्यमासमोर केली.

ईडीला समर्थपणे सामोरे गेले

सुनील राऊत म्हणाले, आज जे चाळीस आमदार एकनाथ शिंदेमागे गेले ते या चालु असलेल्या भोंग्यामुळेच गेले. ते काय सांगणार भोंगा बंद झाला. संजय राऊत ईडीला सामोरे गेले, ते दबावाला बळी पडले नाहीत. न जुमानता न घाबरता ते ईडीसमोर आहेत. संजय राऊतांनी अटक करुन घेतली याचा अर्थ संजय राऊत कुठेही दबावाला बळी पडले नाहीत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनाही त्यांचा अभिमान आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात माध्यमांना बोलण्यापूर्वी त्यांनी मुद्दामहून भोंग्याचा आवाज ऐकु येतो का असा टोला लगावला. त्यानंतर ते म्हणाले, ''एक भोंगा गेला आत, आता आवाज येतो काय? आता आवाज येणारच नाही. आठ वाजताचा भोंगा आता बंद झाला.

परफेक्ट न्याय मिळेल- सुनील राऊत

खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत म्हणाले, भाजपविरोधात बोलले म्हणून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना अटक केली तरीही न्यायव्यवस्था न्याय देईल. काल सकाळी साडेसात वाजता चौकशी ईडीने सुरु केली. आज दुपारपासून न्यायालयात संजय राऊत यांची वाट पाहात होतो पण त्यांची मेडीकल चाचणी झाली. त्यानंतर कोर्टात त्यांना हजर करण्यात आली आहे. न्यायव्यवस्था परफेक्ट न्याय आम्हाला देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...