आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा दावा:16 बंडखोर आमदारांचे निलंबन अटळ, त्यांना राज्यपालही वाचवू शकणार नाहीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाच्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे. बंडखोर आमदार मात्र उपाध्यक्षांना नोटिसा बजावण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत आमदारांचे निलंबन अटळ असल्याचा दावा शिवसेनेचे विधी सल्लागार देवदत्त कामत यांनी केला आहे. आमदारांची सभागृहाबाहेरील कृतीही पक्षविरोधी ठरू शकते. या प्रकरणात राज्यपालही आमदारांना वाचवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि अॅड. कामत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी या कायदेशीर पेचातील ४ महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. पक्ष चिन्हावर दावा सांगणे शिंदेंना अशक्य. माझा महाराष्ट्र