आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे व्हायरल तापातून बरे:'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे व्हायरल फिव्हरमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. यासह त्यांनी 17 ऑगस्टपासून ‘शिव संवाद’ यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘शिवसंवाद’ यात्रेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी भिवंडी, शिर्डी, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर येथील शिवसैनिकांशी संवाद साधला होता.

शिवसेना भवनातून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा रायगड निघणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात रायगड जिल्ह्यात दोन ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. 17 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा हा दौरा असणार आहे . दौऱ्या दरम्यान दुपारी 1:30 वाजता अलिबाग आणि दुपारी 4:30 वाजता महाड येथे 'शिव संवाद' होणार आहे .

गोगावले आणि दळवी निशाण्यावर
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशनही 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रायगड जिल्ह्यात ज्या दोन ठिकाणी ठिकाणी शिवसंवाद यात्रा काढणार आहेत. त्यापैकी एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतोद भरत गोगावले यांचा तर दुसरा परिसर आमदार महेंद्र दळवी यांचा आहे. यापूर्वीच्या दोन शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे 17 ऑगस्टच्या शिवसंवाद यात्रेत शिंदे गटाचे हे दोन आमदार त्यांच्या निशाण्यावर असणार आहेत.

शिवसंवाद यात्रेचा झंझावात

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. रस्त्यावर आणि कोर्टात लढा सुरू आहे. शिवसेना कोणाची इथपर्यंत वाद पोहोचला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेना पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी सध्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. शिवसंवाद यात्रेचा झंझावात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही संवादयात्रा समाजातील सर्व स्तरातील जनतेपासून ते शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणणारी ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...