आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावले

महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा समाचार घेतला. कंगना, अर्णब प्रकरणी कोर्टाचा निकाल, आरे मेट्रो कारशेड या प्रकरणांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचे व्हिजन आवश्यक होते, मात्र ते दिसले नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात धमकी देणार असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. नुसती धमकी देणारी भाषा ही नाक्यावर होत असते. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचे भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचे दिसून आले. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती.” अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

स्थगिती देण्यापलीकडे सरकारने काहीही केले नाही

हे सरकार विश्वासघाताने आले आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आला आहात. कारण, एका पक्षासोबत युती करून मतं मागितली. पंतप्रधान मोदी यांचा चेहरासमोर ठेवून त्यांच्या नावाने मतं मागितली. त्यामुळे हे सरकार विश्वासघातातून आलेले सरकार आहे. सत्तेवर आल्यानंतर एका वर्षातील उपलब्धी काय आहे, फक्त स्थगिती देण्यात आली. स्थगिती देण्यापलीकडे या सरकारकडे काहीही केले नाही, असेही फडणवीस म्हणाले.

छोट्या पुस्तिकातून सत्य लोकांपर्यंत पोहोचवणार

'आरे कारशेड प्रकल्पाचे सत्य आम्ही मुंबईतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. आरे कारशेडचा निर्णय हा मुंबई विरोधी आहे. काही अधिकारी हे मुख्यमंत्र्यांचा ईगो मसाज करत आहे. हा निर्णय मुंबईकरांच्या निर्णयाविरोधातला निर्णय आहे. त्यामुळे याचे सत्य छोट्या पुस्तकीतून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

...तर न्यायालयाला सुद्धा महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?

'अर्णब आणि कंगनाच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही. पण कंगना रनोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला चपराक लगावली आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणणारे न्यायालयाला सुद्धा महाराष्ट्रद्रोही म्हणणार आहे का? राज्य सरकारने कुणावर कारवाई करणार हे स्पष्ट करावे, गृहमंत्री अनिल देशमुख आता माफी मागणार आहे का? असा थेट सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला.

अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

आम्ही कधीही कुणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीही टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलता, काय टीका करता, काय टीव्ट करता, हे सर्वांनी पाहिले आहे. पण मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर हे उत्तरानेच देईल' असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser