आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:महापालिकेत तीन सदस्य प्रभाग रचना कायम राहणार; राष्ट्रवादी, काँग्रेसचा विरोध मुख्यमंत्र्यांनी काढला मोडीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात यावी या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागण्यांना मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकी वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांचा विरोध मोडून काढत तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे मागच्या बैठकीतील इतिवृत्त मंजूर केल्याचे समजते.

मागच्या मंत्रीमंडळ बैठकीत २२ सप्टेंबर रोजी महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभागासंदर्भात सुधारणा अधियमाचा अध्यादेश मंजूर करण्यात आला होता.त्यामध्ये महापालिकांत ३, नगपरिषदांमध्ये २ आणि नगरपंचायतीमध्ये १ सदस्यीय प्रभाग रचनेची तरतूद करण्यात आली होती.

मात्र काँग्रेसने तीन सदस्यीय प्रभाग रचनेला जाहीर विरोध केला होता. तसेच राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा दोन सदस्यीय प्रभाग रचनेचे समर्थन केले हाेते. त्यामुळे आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत इतिवृत्त मंजूर करताना अध्यादेशाच्या प्रस्तावात बदल केला जाईल, तो दोन सदस्यीय करण्यात येईल, सर्वांची अशी अटकळ होती.

खड्ड्यांचा विषय गाजला
१. मुंबईत एकसदस्यीय प्रभाग रचना कायम आहे. नगरविकास मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचा तीन सदस्य प्रभाग रचनेसाठी आग्रह होता. तीन सदस्यीय प्रभाग रचना ठाणे महापालिके शिंदे यांच्यासाठी लाभाची ठरणार आहे.
२. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत गाजला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक ते मुंबई प्रवासाची हकीकत बैठकीत कथन केली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांचा विषय गांभीर्याने घेत उद्या, बुधवारी (ता.२९) संबंधितांची बैठक बोलावली आहे.

बातम्या आणखी आहेत...