आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Time Of The End Of The Shinde Group Has Come, The Predictions Of The Ambadas Demons; Chandrakant Khaire Said The Rebels Who Wielded Sticks Got Slapped

शिंदे गटाचा संपण्याचा काळ आला:अंबादास दानवेंचा तिखट हल्ला; चंद्रकांत खैरे म्हणाले- काड्या करणाऱ्या बंडखोरांना चपराक

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने आज परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून ​​​​​​ भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती दिवस रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील. शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला तर काड्या करणाऱ्या बंडखोरांना चपराक मिळाली असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.

बंडखोरांनो आता बस्स - खैरे

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेना 1966 पासून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत आहे. तिथेच मेळावा घेण्याबाबत ठरले. त्याबाबत सतत बैठका होत राहिल्या. दसरा मेळावा होऊ नये म्हणून काड्या करण्याचे काम केले जात आहे. जे बंड करणारे लोक आहेत त्यांना मी म्हणेल की, आता बस झाले. त्यांना न्यायालयाने चपराक दिला. मी न्यायपालिकेला धन्यवाद देईल.

शिंद गटाचा संपण्याचा काळ- दानवे

शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, आमचा न्यायदेवतेवरील विश्वासाची दृढता वाढवणारा आजचा निकाल आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील. शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालाबाबत मी मत व्यक्त करणार नाही.

मी काय प्रतिक्रिया देऊ? फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयावर मी काय प्रतिक्रिया देऊ? न्यायालयाने जे सांगितले आहे, त्यानुसार प्रशासन पावले उचलेल. पोलिस आणि मुंबई महापालिकेने कोर्टात आपली भूमिका मांडली होती. त्यावरही न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाचा निर्णय ज्या पद्धतीने पाळला जातो. त्याचे पालन केले जाईल. कायदा व

सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था पाळला पाहिजे. कोणतेही नियम मोडू नये. यासाठी गृह विभागाकडून पूर्ण दक्षता घेतली जाईल. न्यायालयीन लढाई आम्ही जिंकली आहे आणि यापुढेही जिंकणार, शिवसेनेच्या या प्रतिक्रियेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यंग्यात्मक स्वरात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रशासनाला जे काही करावे लागेल, ते केले जाईल, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले.

आधी घडत नव्हते ते घडतंय- नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रात आधी जे घडत नव्हते ते आता घडत आहेत. उद्धव ठाकरे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत घेऊन निर्णय घेतले जातात, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

लोक त्यांना मोडीत काढतील - किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, एक महिना शिवसैनिक धास्तावलेले होते. दसरा मेळाव्याचा संस्कार मोडीत काढण्यासाठी जे काम करीत होते त्यांना लोक मोडीत काढतील. कुठल्याही आयुक्तांनी दबावात काम करू नये. पालिका आयुक्तांनी सर्व निर्णय टाॅस केला. हा निर्णय विधी खात्याकडे पाठवला, त्यांनीही निर्णय दिला नाही. त्यामुळे पर्यायच नसल्याने आम्ही हायकोर्टाचे दार ठोठावले. शिंदे गट सुप्रीम कोर्टात जात असेल तर त्यांनी जावे. आमचा संविधानावर विश्वास असून मनपाला चांगलीच चपराक बसली. ते एकाच पक्षाचा धुरा वाहत होते.

2 ते 6 ऑक्टोबपर्यंत परवानगी- अनिल परब

अनिल परब म्हणाले, आमचा अर्ज मुंबई महापालिकेकडे आधीच पाठवला होता, पण त्यावर निर्णय घेतला जात नव्हता. त्यानंतर आम्ही हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर लगेचच महापालिकेने आमच्या अर्जाला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगून नाकारला होता. आम्ही अटींचे पालन करू. राज्य सरकारच्या जीआरनुसार शिवतीर्थावरील कार्यक्रमांना 45 दिवस दिले जातात. आम्ही उच्च न्यायालयाकडून परवानगी घेऊन दसरा मेळावा साजरा करीत आहोत.

सोने लुटण्यापासन, विधींबाबतही आम्ही कोर्टाच्या निरक्षणास आणून दिले. आम्हाला न्यायालयाने 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान आम्हाला मैदान वापरण्यास परवानगी दिली गेली. महापालिकेने जेही आक्षेप नोंदवले, त्यांच्या भूमिकेवर न्यायालयाने वक्तव्य केले आहेत. ते कळतीलच. आम्हाला सर्व आक्षेप फेटाळून परवानगी मिळाली आहे. जी दरवर्षी परवानगी मिळते तीच मिळाली. गेली कित्येक वर्षे आम्ही कोर्ट आम्हाला परवानगी देत आहे. शिवसैनिक शांततेने आणि जल्लोषात मेळावा पार पाडतील यात शंका नाही.

ठसका दिल्लीला पोहचला- अंधारे

सुषमा अंधारे म्हणाल्या, सत्य परेशान होईल, पण पराजित नाही, हे मी आधीच सांगीतले होते. 56 वर्षांची परंपरा अखंडित राहणार आहे. माझा शिवसेनेतील दसरा मेळावा आहे. याचा आनंद असून अशा स्थितीतही अत्यंत जल्लोषात आम्ही साजरा करणार आहोत. मुंबईतील शिवसेनेच्या गटप्रमुखाच्या मेळाव्याचा ठसका दिल्लीपर्यंत गेला होता. आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आम्ही जल्लोषात साजरा करणार आहोत. दसरा मेळाव्यातील भाषण ठसकेबाज नाही तर अनेकांच्या जिव्हारी लागणारे आहे.

त्यांचे कारस्थान अपयशी - विनायक राऊत

विनायक राऊत म्हणाले, शिवसेनेची परंपरा बाळासाहेबांनी सुरू केली. ती उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. न्यायदेवतेचे आम्ही मनापासून आभारी आहोत. सत्याचा विजय झाला. प्रथमतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यापासून सांगत होते की, आम्हाला दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करू हा त्यांचा विश्वास आहे. भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाचा दसरा मेळाव्यात खोडा घालण्याचा प्रयत्नाला अपयश आले. न्यायदेवता सत्याचा न्याय करते. जो निर्णय दिला तो शिंदे गटाला शहाणपणा यावा यासाठी आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्यावर निर्णय लवकरच

शिवाजी पार्कबाबत न्यायालयाचा निर्णय नुकताच आला आहे. बीकेसीमध्ये आम्ही दोन मैदाने आधीच बुक केली आहेत. आता दसरा मेळावा कुठे होणार? याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेणार आहेत. पण हा मेळावा कुठे होईल? याची माहिती पक्षाकडून लवकरच प्रसारमाध्यमांना दिली जाणार आहे. या प्रकाराची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...