आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या बँक खात्यावर ८ महिन्यांच्या एकत्रित मानधनापोटी एकूण १५.७२ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती असून ३,५१५ उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन
राज्यातील सरपंचांचे मानधन नोव्हेंबर २०१९ पासून प्रलंबित राहिले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करून विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
उपसरपंचांना मिळणार आता ‘इतके’ मानधन
> २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये
> २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये
> ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.