आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाषा वापराची सक्ती:मराठीचा वापर आता होणार सक्तीचा; कायद्यात बदल करण्याचा शिवसेनेचा घाट

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 च्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे खरी, मात्र राज्याच्या प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर तसा मर्यादितच आहे. तो वाढावा तसेच मराठी सक्तीची अंमलबजावणी न करणाऱ्यास शास्ती करता यावी यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ च्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० मध्ये झाली. १९६४ मध्ये मराठी राजभाषा अधिनियम पारित झाला. २६ जानेवारी १९६५ पासून देवनागरी मराठी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून अंगीकार करण्यात आला. सर्व शासकीय प्रयोजनाकरिता मराठी भाषा अनिवार्यची १ मे १९६६ पासून सक्ती करण्यात आली. मात्र, १९६४ च्या अधिनियमात कोणाकोणास राजभाषा वापरणे बंधनकारक आहे, याचा नेमका उल्लेख नाही. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्था, न्यायालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांमध्ये मराठीचा वापर फारसा होत नाही. मराठी भाषेची व्याप्ती वाढवणे हा शिवसेनेच्या जुन्या धोरणाचाच भाग आहे.

बातम्या आणखी आहेत...