आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:पीपीई किट घातलेल्या डॉक्टरचा 'गर्मी' गाण्यावरील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील डॉक्टर निशा नेगी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 80 हजाराच्या पार गेली आहे. बीएमसीची सर्व रुग्णालये जवळपास कोरोना रुग्णांनी भरली आहेत. डॉक्टर्स 18-18 तास ड्यूटी करत आहेत. या दरम्यान मुंबईतील पीपीई किट घातलेल्या एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईच्या डॉक्टर निशा नेगी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत पीपीई किट घातलेले डॉक्टर बॉलिवूडच्या फेमस 'गर्मी' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

मुंबईत कोरोनाची परिस्थिती 

मुंबईत कोरोनाच्या 1,372 नवीन रुग्णांची नोंद झाली. येथील एकूण रुग्णसंख्या 81,634 झाली आहे. बीएमसीनुसार, मुंबईत मागील 24 तासांत 73 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 49 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश आहे. यातील 58 रुग्णांची इतर गंभीर आजार होते. उपचारानंतर 1,698 लोकांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत मुंबईत 52,392 आणि राज्यात 1,04,687 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

राज्यात कोरोनाची 1 लाख 92 हजार प्रकरणे

राज्यात मागील दोन दिवसांत 12,694 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासोबत एकूण रुग्णसंख्या 1,92,990 वर पोहचली आहे. आरोग्य विभागानुसार, शुक्रवारी 6,364 आणि गुरुवारी 6,330 रुग्ण आढळले. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 150 मृत्यू मागील 48 तासांत आणि 48 मृत्यू त्याआधी झाले आहेत. राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे 8,376 जणांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...