आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू:ठाण्यात पॉवरलूम फॅक्ट्रीची भींत आणि छत कोसळले, 4 जण गंभीर जखमी

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आणि सर्व मृतदेह रात्री उशीरा बाहेर काढण्यात आले.

राज्यातील ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी परिसरात एका पॉवरलूम कारखान्याची भिंत आणि छत कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये चार लोक जखमी झाले आहेत. यामधून 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आणि सर्व मृतदेह रात्री उशीरा बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये मनसुख भाई (45), रणछोड प्रजापति (50) आणि भगवान जाधव (55) यांचा समावेश आहे. जखमींना जवळच्याच एका खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. ठाण्याच्या रीजनल डिजास्टर मॅनेजमेंट सेल (RDMC) चे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, ही दुर्घटना तुकाराम कंपाउंड येथील कारखान्यात घडली.

सर्व मृतदेह ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सर्वांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. हे सर्व ठाण्याच्या बाहेर राहणारे होते आणि येथे भाड्याने राहत होते.

बातम्या आणखी आहेत...