आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांताक्रुझमधील व्यापारी कमलकांत शहा यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता वेगळे वळण मिळाले असून शहा यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्या पत्नीनेच प्रियकर हितेश जैनच्या मदतीने कमलकांत यांना दररोज थोडं थोडं जेवणातून विष दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. तपासानंतर पोलिसांनी शहा यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे. दरम्यान, विमा कंपनीत असलेल्या पतीच्या पॉलिसींबाबतही पत्नीने चौकशी केल्याचे तपासात समोर आले आहे.
१९ सप्टेंबर रोजी शरिरातील सर्व अवयव निकामी झाल्यानंतर शहा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शहा यांच्या रक्तात ‘आर्सेनिक’ आणि ‘थॅलियम’ अतिरिक्त प्रमाणात आढळून आले. याच लक्षणांमुळे शाह यांच्या आई सरला यांचाही १३ ऑगस्टला मृत्यू झाला होता. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के. एस झंवर यांच्यासमोर सुनावाणी झाली असता आरोपींना आठ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शहांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही बसला धक्का “कमलकांत शहा याचे अवयव निकामी होऊ लागल्यानंतर डॉक्टरांना धक्का बसला होता. त्यांच्या रक्तात धातू असल्याचा संशय आल्याने रक्ताचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले. १३ सप्टेंबरला आलेल्या या अहवालात आर्सेनिकची उच्च पातळी सामान्यपेक्षा ४०० पट तर थॅलियमची पातळी सामान्यपेक्षा ३६५ पटींनी जास्त आढळून आली. हे विषारी पदार्थ कोणीतरी कमलकांत यांना दिल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपींनी खुुनाची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.