आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची भीती:महिलेवर उपचार केले जनरल वाॅर्डात, मृत्यूनंतर समजले होती कोरोनाबाधित; अनेक नर्सची 'होम क्वाॅरंटाइन’ची मागणी

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तीनशे डॉक्टर, परिचारिका क्वाॅरंटाइन

मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर चक्क जनरल वाॅर्डात उपचार झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील सर्व कर्मचारी व परिचारिका धास्तावले असून आपल्याला होम क्वॉरंटाइन करावे, या मागणीसाठी त्यांनी बुधवारी आंदोलन केले.   ३८ वर्षे वयाची महिला रुग्ण चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल होती. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्याने तिला सर्वसाधारण वाॅर्डात दाखल करण्यात आले होते. सोमवारी तिची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिकांना ती कोरोनोबाधित होती, असे समजले. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांना काही माहिती नव्हती. परिणामी कर्मचारी, डाॅक्टर व परिचारिका घाबरले आहेत.  बुधवारी सकाळी त्यांनी रुग्णालयाच्या डीनकडे आम्हाला होम क्वाॅरंटाइन करा, अशी मागणी केली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्वांना होम क्वाॅरंटाइन करण्यात येईल, असे सांगितले. 

तीनशे डॉक्टर, परिचारिका क्वाॅरंटाइन

मुंबईतील जसलोक आणि वाेक्हार्ट या दोन खासगी रुग्णालयांतील ३०० पेक्षा जास्त डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधिताच्या संशयामुळे रुग्णालयातच क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. ही दोन रुग्णालये पालिकेने बंद केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या भाभा रुग्णालयातला गोंधळ पुढे आल्याने डाॅक्टर्स, कर्मचारी व परिचारिका यांच्या सुरक्षिततेशी रुग्णालय प्रशासनाकडून तडजोड केली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्य सरकारकडे आजमितीस २५ हजार पीपीई किट उपलब्ध आहेत. 

बातम्या आणखी आहेत...