आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OBC समर्पित आयोगाच्या कामावरून वाद:आडनावे पाहून एम्पेरिकल डेटाचे काम; भाजपसह आघाडीच्या मंत्र्यांची नाराजी

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी स्थापित समर्पित आयोगाच्या कामावर भाजपसोबतच सत्ताधारी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी एम्पेरिकल डेटा गोळा करायचे सुरू केलेले काम अत्यंत चुकीच्या आणि सदोष पद्धतीने सुरू आहे. केवळ आडनावे पाहून ओबीसी आहे की नाही ते ठरवले जात आहे. त्यामुळे ओबीसींचे कायमचे नुकसान होईल. राज्य सरकारने वेळीच सावध व्हावे, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला.

फडणवीस यांच्या या आरोपांसोबतच ओबीसी लढ्याचे नेतृत्व करणारे मंत्री छगन भुजबळ आणि तसेच विजय ‌वडेट्टीवार यांनीही आयोगाच्या या पद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आडनावावरून जात ओळखणे चुकीचे : छगन भुजबळ
राज्यात पवार, जाधव, गायकवाड, शेलार, होळकर अशी अनेक आडनावे वेगवेगळ्या जातींत आढळतात. डेटा जमा करताना काही ठिकाणी आडनावावरून जात गृहीत धरली जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ओबीसींचा खरा टक्का समोर येणार नाही, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य : विजय वडेट्टीवार
फडणवीस यांनी डेटा गोळा करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांत काही अंशी तथ्य आहे. आडनावावरून डेटा गोळा करण्याचे सुरू असलेले काम चुकीचेच आहे. आडनाव घेताना जात व प्रवर्गाची ग्रामपंचायतीकडून तपासणी व्हावी, असे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...