आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयवाद:बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम हे आमच्या काळातील, भूमिपूजनसुद्धा झाले होते; देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला

मुंबईतील मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती होती. दरम्यान, त्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजन करण्यात आले होते असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ते म्हणाले की, 'बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे.'

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे'

बातम्या आणखी आहेत...