आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंची टीका:त्यांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू देवदेवतांवर बोलण्याचा भाजपला अधिकार नाही. प्रभू श्रीरामाच्या नावावर ज्यांनी करोडो जनतेकडून पैसे घेऊन स्वतःचे खिसे भरले, अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कार्यात जमीन घोटाळे करून पैसे खाल्ले, त्यांना देवदेवतांवर बोलण्याचा काय अधिकार? महापुरुष व हिंदू देवतांच्या नावाखाली भाजप आंदोलन करत आहेत. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असे म्हणतात. राज्यात शिंदे-भाजपची सरकार आल्यानंतर सत्ताधाऱ्यांची दादागिरी वाढली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केला.

पटोले म्हणाले, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबरच्या हल्लाबोल मोर्चाने भाजपची झोप उडाली. जनतेतील संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन करण्याचे नाटक भाजप करत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानातून महापुरुषांचा अपमान झाला. तेव्हा आशिष शेलार हे कुठे होते? हा या महापुरुषांचा अपमान नाही का? त्यावर भाजपने माफी का नाही मागितली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...