आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूचक विधान:....तर भाजपने ठाकरे सरकारला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा 'एनडीए'चे सरकार स्थापन करावे- सुब्रमण्यम स्वामी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

निर्णय प्रक्रीयेत विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत, काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामीयांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावे, असे सुब्रमण्यम स्वामींनी वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रकीयेत काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बैठकाही झाल्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रहितासाठी भाजपने ठाकरे सरकारला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा 'एनडीए'चे सरकार स्थापन करावे', असे ट्वीट स्वामी यांनी केले. दरम्यान, यापूर्वीही सुब्रमण्यम स्वामींनी अशाचप्रकारचे वक्तव्य केले होते. त्यांनी गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याचा सल्ला दिला होता.

बातम्या आणखी आहेत...