आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुपित रहस्ये:हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपिते दडलेली : नवाब मलिक, दिवाळीनंतर मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राजकीय शस्त्रसंधी केली. तथापि, हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपित रहस्ये दडलेली असून, रविवारी भेटूया, असे ट्वीट मलिक यांनी बुधवारी (३ नोव्हेंबर) केले. त्यामुळे दिवाळीनंतर मलिक कोणता गौप्यस्फोट करतात याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग पार्टीचे प्रकरण गेल्या चार आठवड्यांपासून गाजत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नवाब मलिक सातत्याने आरोप करीत आहेत. काल मंगळवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर दिवाळसणात थोडीसा विश्रांतीचा पॉझ घेऊन नवाब मलिक यांनी ललित हॉटेलमध्ये दडलेली रहस्ये बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. याआधी वरळीच्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या कथित ड्रग पार्टीच्या उद्योगाविषयी मलिक यांनी भाष्य केले होते.

बुधवारी बुधवारी मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केले आहे. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, असे मलिक यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी ट्वीट केले आहे. शुभ दीपावली. आप सभी को दिवाली मंगलमय हो. हॉटेल द ललित में छुपे हैं कई राज…मिलते हैं रविवार को…या ट्वीटमुळे येत्या रविवारी नवाब मलिक काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा वानखेडेंचे कपडे महागडे
समीर वानखेडे लाखाे रुपयांचे कपडे घालतात. पंतप्रधान मोदींच्या कपड्यांपेक्षा वानखेडे यांच्या कपड्यांची किंमत जास्त आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या वसुलीची चौकशी केली पाहिजे, या मागणीवर ठाम आहे. अमली पदार्थांचा खुलेआम खेळ राजकीय आश्रयाशिवाय चालूच शकत नाही. यात बडी धेंडे अडकली असल्याचा मलिक यांचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...