आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांकडून अनिल देशमुखांची पाठराखण:'परमबीर सिंह यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही' - शरद पवार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य प्रकरणावरुन दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 'आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही' असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

आरोपात तथ्य नाही, राजीनाम्याचा प्रश्नच नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, 'परमबीर सिंह यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत अनिल देशमुख रुग्णालयामध्ये होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही, अनिल देशमुख या काळात मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुख प्रकरणावरुन दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न

'महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंह यांनी जे नमूद केलेले आहे, वाझे प्रकरणामध्ये, त्याबद्दल माझं मत आहे की, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे. ही गाडी कोणाची होती. मनसुख हिरेन यांची हत्या का झाली. हे प्रमुख प्रश्न आहेत. मात्र मुख्य प्रकरणावरुन दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

वाझे आणि देशमुखांची भेट झालीच नाही
शरद पवारांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझेंची भेट झाल्याचा दावा फेटाळला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयामध्ये होते असे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंह यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. मी रुग्णालयामधून ही माहिती घेतली आहे. देशमुख रुग्णालयामध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड असल्याचेही देशमुख म्हणाले. तसेच 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम कॉरेन्टाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांचा होता. असे असुनही सिंह कोणत्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत? असा सवालही पवारांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...