आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:गुप्त काही नसते, दोन नेते भेटल्याने सरकार पडत नाही; पवार, शहा भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर वेगवेगळे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, कुणी कितीही काही प्रयत्न करोत राज्यातील सरकारला कुठलाही धोका नाही. राजकारणात गुप्त काही नसते. पहाटेचा शपथविधी तेवढा गुप्त होता. दोन नेते भेटल्याने सरकार पडत नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला खूप काम आहे. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगडं अडकवण्याचं काम करू नका आणि ऊठसूट आरोपांचे रंग उधळू नका,’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.

पोलिस खात्यातील बदल्यांचे रॅकेट व सचिन वझेप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना पुरावे दिले आहेत. वझेंचे खरे मालक चिंतेत आहेत, असं वक्तव्य फडणवीसांनी दिल्ली भेटीनंतर केलं होतं. यावर त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. विरोधी पक्षनेते अशा प्रकारचे आरोप, टीका-टिप्पणी करत असतात. गृहमंत्री, गृहसचिव आणि पंतप्रधान दिसतात. पण महाराष्ट्रातलं सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे. भलेही ते तीन पक्षांचं असेल. त्यामुळं इथं काय निर्णय घ्यायचा? काय भूमिका घ्यायची? हे इथल्या सरकारला चांगलं माहीत आहे,’ असं राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...