आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा विशेष!:शिंदे गटाच्या व्यासपीठावर धनुष्यबाणाचे चिन्ह नाही; पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो

मनोज व्हटकर|मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना एका मागे एक धक्का देत सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा धक्का देण्याची तयारी केली आहे. मात्र व्यासपीठावर लावलेल्या भव्य अशा फलकावर धनुष्यबाणाचे चिन्ह दिसस नाही. असे असताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे छायाचित्र मात्र पोस्टर वर लावले आहे.

मेळाव्यावासाठी पोलिसांचा बंदोबस्त

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील मैदानावर एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांचा मेळावा आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते येथे पोहोचले आहेत. खाजगी वाहनांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मैदानाच्या उजव्या बाजूला भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर त्या लगतच पार्किंगची ही व्यवस्था आहे. मोठा पोलिस बंदोबस्त असून पोलिसांनी वाहने आत सोडायला बंदी घातली आहे. त्यामुळे लांबून मैदानापर्यंत चालत यावे लागत आहे. आलेल्या अनेक शिवसैनिकांना नेमके कुठे जायचे याचे मार्गदर्शन रस्त्यावर कुठे दिसत नसल्याने एकमेकाला विचारणा करुन शिवसैनिक मैदानात येत आहे.

दुसरीकडे मैदानावर भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्यावर भव्य दिव्य डिजिटल फलक लावण्यात आला आहे. एल इ डी डिजिटल फलके आहेत त्यावरून चलचित्रे दाखवले जाते. व्यासपीठाची तयारी पाहण्यासाठी मंत्री उदय सामंत तसेच अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. चर्चेचा विषय फलकावर नसलेले धनुष्यबाण हाच दिसत आहे. सर्व से कहो हम हिंदू है असे त्यावर ठळकपणे लिहिले आहे. आणि एकीकडे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे आनंद दिघे यांची छायाचित्रे आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार असे त्यावर लिहिलेले आहे. मात्र शिवसेनेचे धनुष्यबाण दिसत नाही

पोस्टरवर धनुष्यबाणाचे चिन्ह नाही

सध्या धनुष्यबाणाचा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असून त्यावर एक-दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे समर्थकांनी धनुष्यबाणाचा इथे कुठेही प्रदर्शन केलेले दिसत नाही. हेच या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...