आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • There Is Not A Single Patient In Maharashtra Of New Corona Strain, Seven In The Country, However ... We Should Not Be Afraid Of Him; Here Are 4 Main Reasons

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड-19 नवा स्ट्रेन:राज्यात एकही रुग्ण नाही, देशात 20, मात्र... आपण त्याला घाबरून जाऊ नये; ही आहेत 4 प्रमुख कारणे

औरंगाबाद/ नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजवर ब्रिटनहून आलेले 114 जण कोरोनाबाधित

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे (स्वरूप) भारतातही वीस रुग्ण आढळले आहेत. हे सर्व लोक ब्रिटनहून नुकतेच भारतात परतले आहेत. यातील एक ४७ वर्षीय महिला दिल्लीच्या आयसोलेशन सेंटरमधून पळून आंध्रात गेली होती. दरम्यान, महाराष्ट्रात ब्रिटनहून आलेल्या एकाही व्यक्तीत कोरोनाचा नवा स्ट्रेन नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

औरंगाबादेतील एका कार्यक्रमात मंत्री टोपे म्हणाले, एनआयव्हीने राज्यातील ४३ व्यक्तींचे नमुने तपासले. त्यापैकी एकालाही नव्या स्ट्रेनची बाधा नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. नव्या स्ट्रेनच्या कोरोनाच्या संसर्गाचा वेग ७०% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरात यूकेतून महाराष्ट्रात आलेले ३० जणांना काेरोना संसर्ग झाला आहे. मात्र त्यापैकी एकाही रुग्णात ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला नसल्याची माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मंगळवारी दिली.

आपण त्याला घाबरून जाऊ नये; ही आहेत ४ प्रमुख कारणे

1. वेगाने पसरतो, मात्र मृत्यू वाढले नाहीत

‘ब्रिटनमध्ये नव्या स्ट्रेनमुळे संसर्ग ७०% वेगाने वाढला, मृत्यू वाढले नाहीत. ज्यांना संसर्ग झाला त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत.’ - डॉ. सौम्या स्वामिनाथन, मुख्य वैज्ञानिक, डब्ल्यूएचओ

2. स्ट्रेनवर लस पूर्णपणे परिणामकारक

‘नवा स्ट्रेन मूळ विषाणूेपक्षा जास्त बदललेला नाही. आजवर निर्मित लसी त्यावर परिणामकारक आहेत. कोविशील्ड, स्पुटनिक-५ लसही प्रभावी आहे.’ - प्रो. संजय राय, दिल्ली एम्समध्ये ट्रायल प्रमुख

3. ब्रिटनहून आलेल्या सर्वांची तपासणी

‘२५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनहून ३३ हजार लोक आलेत. सर्वांची तपासणी होत आहे. नवा स्ट्रेन असलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना अायसोलेट केले आहे.’ - राजेश भूषण, सचिव, आरोग्य मंत्रालय

4. रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंंग होईल

‘देशातील एकूण रुग्णांच्या ५% लाेकांचे जिनोम सिक्वेन्सिंंग करण्याचा निर्णय प्रथमच घेतला आहे. यातून विषाणू किती बदलला आहे, हे कळेल.’ - डॉ. व्ही.के. पॉल, नॅशनल कोविड टास्क फोर्स

आजवर ब्रिटनहून आलेले ११४ जण कोरोनाबाधित

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान एकूण ३३,००० प्रवासी ब्रिटनमधून भारतात आले. ब्रिटनचा स्ट्रेन आढळलेल्या सातही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडलेली नाही. गेल्या काही दिवसांत ब्रिटनहून भारतात आलेले ११४ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. ते केरळ, आंध्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, तेलंगण, हिमाचल व पंजाबमधील आहेत. ते सर्व आयसोलेशन आहेत.

विमानबंदी वाढण्याची शक्यता : ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर भारताने २३ ते ३१ डिसेंबरपर्यंत बंदी आणली आहे. ही बंदी पुढेही वाढवली जाऊ शकते.

१६ देशांत फैलाव : नवा कोरोना स्ट्रेन डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, भारत, लेबनाॅन व सिंगापुरात आढळला आहे.

लसींची चाचणी सुरू : स्ट्रेनवर चाचणी सुरू केलेल्या नोवाव्हॅक्स बायोटेकने म्हटले आहे की, यावर आजवरच्याही लस परिणामकारक आहेत. याशिवाय फायझर तसेच मॉडर्ना या कंपन्यांनीही नव्या स्ट्रेनच्या चाचण्यांना प्रारंभ केेला आहे.

बातम्या आणखी आहेत...