आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यासंदर्भात आदेश ठाकरे सरकारकडून शुक्रवारी जारी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
राज्यभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मिशन बिगिनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलावत आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
खरेतर देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. यासंदर्भातील सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी जारी केल्या होत्या. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्राची परवानगी घेणे आश्यक आहे. कोरोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.