आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद:18, 19 मे रोजी ‘या’ भागात पाणी पुरवठा होणार नाही; नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उपनगरात जलवाहिन्यांचे काम केले जाणार असल्याने 18 आणि 19 मे रोजी काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने पूर्व उपनगरातील एन विभागात जलविहिन्यांचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये सोमय्या नाल्याखाली मायक्रोटनेलिंग पद्धतीने काम करण्यात येणार असून, त्यामुळे 18 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 19 मे च्या सकाळी 10 वाजेपर्यंत काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जलविहिन्यांचे काम होत असल्याने मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असून, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन, किंग सर्कल, माटुंबा, परेल या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. विभागानुसार एल पूर्व , एन, एन पश्चिम, एफ उत्तर, एफ दक्षिण या विभागात पाणीकपात होणार आहे.

या भागात होणार पाणी कपात

एल पूर्व - राहुल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरू नगर दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पम्पिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पम्पिंग स्वदेशी मिल मार्ग

एन - राजावाडीचे सर्व क्षेत्र, चित्तरंजन नगर वसाहत, आंबेडकर नगर, नीळकंठ व्हॅली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक पूर्वेकडील रस्ता, ओएनजीसी वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता

एम पश्चिम - टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर.

एफ उत्तर - वडाला ट्रक टर्मिनल, न्यू कफ परेड, प्रतीक्षा नगर, पंचशील नगर, शीव पूर्व आणि पश्चिम, सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो.

एफ दक्षिण - दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता, परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली

बातम्या आणखी आहेत...