आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदेंच्या नगरविकास खात्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मोठा हस्तक्षेप होता. उद्धव मुख्यमंत्री बनल्यापासून शिंदेंना पक्षातील निर्णयप्रक्रियेतून बाजूला केले होते. त्याचा कडेलाेट राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत झाला. त्यामुळे शिंदेंनी बंड केल्याचे सांगण्यात येते.
शिंदेंनी शिवसेना आमदारांचा पाठिंबा कसा मिळवला?
शिंदे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा होत्या. मात्र सोबत फक्त ७ -१० आमदार होते. नंतर शिंदेंनी आपल्या खात्यातील मोठा निधी अपक्ष-नाराज सेना आमदारांना खुला केला. उद्धव भेटत नाहीत, अधिकारी जुमानत नाहीत, अशा कात्रीत सापडलेल्या आमदारांना शिंदे यांनी आपलेसे केले.
शिंदेंची सरकार व शिवसेनेत भूमिका किती उरली होती?
२०१९ मध्ये आघाडी सरकारमध्ये सीएमपदाची आशा शिंदेंना होती. मात्र उद्धव मुख्यमंत्री बनले. अनिल देसाई व परब हे उद्धव यांचे सल्लागार बनले, शिंदेंची भूमिका मर्यादित झाली. शिंदेंचे नगरविकास खाते आदित्य यांच्याकडे, तर देसाईंचे उद्योग खाते शिंदेंकडे देण्याचाही उद्धव यांचा विचार होता.
नाराजीत भर पडण्यामागे ज्युनिअर नेत्यांच्या लुडबुडी?
नाराज शिंदे यांना उद्धव यांनी आपल्याकडचे नगरविकास हे खाते दिले. मात्र आदित्य ठाकरे व युवा सेनेचे वरुण देसाई शिंदेंच्या खात्यात लुडबूड करत राहिले. सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसीवर आदित्य हे बीएमसी अधिकाऱ्यांची नेमणूक करत हाेते, आदेश देत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.