आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:316 दिवसांत तिसऱ्यांदा टक्कर ; भारत-पाक सुपर-4 सामन्यात समोरासमोर

मुंबई / चंद्रेश नारायणनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकासाठी भारत आणि पाकिस्तान रविवारी पुन्हा एकदा समाेरासमोर असतील. सुपर-४ चा हा समाना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून खेळला जाणार जाईल. दोन्ही संघ ३१६ दिवस म्हणजे सुमारे १० महिन्यांनंतर तिसऱ्यांदा भिडतील. या वेळी भारतासमोर आणखी कडवे आव्हान आहे. कारण तो पाकिस्तानच्या तुलनेत कमजोर दिसत आह. भारतासाठी सर्वात मोठी चिंता आघाडीची फळी आहे. विशेषत: कर्णधार रोहित आणि उपकर्णधार के.एल. राहुल. विशेषत: राहुल जखमी झाल्यानंतर पुनरागमन करत आहे. तो खराब फॉर्मशी झुंजत आहे. रोहितही मोठी धावसंख्या करू शकला नाही. पाकविरुद्ध त्याचा संघर्ष दिसत होता. हाँगकाँगविरुद्ध चांगली सुरुवात होऊनही तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. राहुल दोन्ही सामन्यांत फेल ठरला. कोहली पाकविरुद्ध खराब शॉट खेळून बाद झाला. तथापि, हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याच्या फलंदाजीत सुधारणा दिसली. या वर्षी टी२० त चांगल्या फॉर्ममध्ये राहिलेल्या सूर्यकुमारने हाँगकाँगविरुद्ध चांगली कामगिरी केली. बुमराह व हर्षलच्या अनुपस्थितीत भारताची वेगवान गोलंदाजी चांगली नाही. आवेश दोन्ही सामन्यांत महागडा ठरला. तो तापाने फणफणला असून रविवारी खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी दीपक चाहरला संधी मिळू शकते. दीपक राखीव खेळाडू म्हणून संघासोबत गेला असता तो सातत्याने नेटमध्ये घाम गाळताना दिसला. तर अर्शदीपने पाकविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती.

पाककडे चषकातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचे आक्रमण
पाकिस्तानकडे या चषकात सर्वात चांगले वेगवान गोलंदाजीचे आक्रमण आहे. त्यांच्याकडे वेग आणि उसळी असल्याने फलंदाजांची अडचण होते. हे पाकविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही दिसले. तथापि, शाहनवाज दहानी जखमी असल्याने सामन्यात नसेल. परंतु नसीम शाह आणि हॅरिस रउफ हे भारतासाठी चिंतेचा विषय आहे. फिरकीपटूही संघासाठी सहायक ठरले. मोहंमद नवाज आणि शादाब खानने हाँगकाँगवरुद्ध ७ बळी घेतले होते. भारतासाठी सर्वात चांगली संधी म्हणजे कर्णधार कप्तान बाबर आजम खराब फॉर्म सुरू आहे. जर बाबर आणि दुसऱ्या ओपनरला लवकर बाद केले तर त्यांच्यासाठी विजय सोपा ठरेल. कारण पाकची मध्य फळी खूप खराब आहे. टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर त्यांची मधली फळी लडखडू शकते.

जडेजा जखमी, रोहितला डोकेदुखी!
{अक्षरची अगदी योग्य रिप्लेसमेंट आहे. पण जेवढे सोपे दिसते तेवढे नाही. त्याच्या मॅच फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अक्षर स्टँडबाय खेळाडूंमध्ये तर होता. पण केवळ दीपक चाहरच प्रशिक्षण घेत होता.
{जडेजाच्या अनुपस्थितीत पंतला घ्यावे लागेल. कारण तो डावखुरा फलंदाज आहे. पाकविरुद्ध पहिल्या सामन्यात पंत संघात नव्हता. परंतु हाँगकाँगविरुद्ध हार्दिकला आराम दिला गेला तेव्हा पंतला संधी मिळाली होती. भारताकडे टॉप-५ मध्ये उजव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे संतुलन राखण्यासाठी डावखुऱ्या पंतला प्लेइंग ११ मध्ये ठेवावे लागेल.

{ भारत पंतला घेऊन खेळणार असेल तर अडचण अशी की, संघात दोन यष्टीरक्षक होतील. जर दिनेश कार्तिक आणि पंत या दोघांनाही खेळवले तर अक्षरला खेळवणे कठीण होऊन जाईल. र हार्दिकच्या परतण्याचा अर्थ असा होईल की संघ केवळ एका फिरकीपटूसह उतरेल. संघ अशा स्थितीत केवळ एका फिरकीपटूवर खेळण्याची जोखीम घेईल का, हे बघणे रंजक ठरेल.

टीम इंडियाकडे पाकिस्तानला आशिया चषकात सलग पाचव्यांदा हरवण्याची संधी टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानला हरवले तर संघाची आशिया चषकात पाकिस्तानला सलग पराभूत करून पाचवा विजय असेल. गेल्या रविवारी हरवण्यापूर्वी भारताने २०१६ मध्ये एक वेळा आणि २०१८ मध्ये सलग दोन वेळा पाकला हरवले होते.

बातम्या आणखी आहेत...