आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जमीन घोटाळा:ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने, मला आणि माझ्या कुटुंबियांना छळण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

पुण्यातील भोसरी जमीन घोटळ्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे अडचणीत आले आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे ईडीने आज एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

परंतु, एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद रद्द झाल्याने ते या चौकशीला जातील की नाही? यावरुन तर्क विर्तक लावले जात होते. परंतु, एकनाथ खडसे हे ठरलेल्या वेळी ईडी कार्यालयात हजर झाले असून ईडीचे ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. खडसे यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ही कारवाई राजकीय सुडापोटी - खडसे
मी जेंव्हापासून भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो तेंव्हापासून माझ्या चौकश्या सुरु झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असून हे मला आणि माझ्या परिवारला छळण्यासाठीचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. मी ईडीला या चौकशीत पूर्णपणे सहकार्य करीत असून मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री होते. व त्यांच्याकडे यावेळी 13 खाती देण्यात आल्या होत्या. एमआयडीसीचा 40 कोटी बाजारमूल्याचा भूखंड एकनाथ खडसे आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून अत्यंत कवडीमोल भावात (3.75 कोटी) आपल्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्याची तक्रार पुणेस्थित उद्योगपती हेमंत गावंडे यांनी सन 2016 मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती.

या तक्रारीच्या आधारे एसीबीने खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सन 2018 मध्ये एसीबीने पुणे न्यायालयात या प्रकरणी 22 पानी अहवालही सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...