आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियाने बदलले आयुष्य:नातीला शिकवण्यासाठी ऑटो चालकाने विकले घर, माहिती व्हायरल झाल्यानंतर लोकांनी दिले 24 लाख रुपये

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झोपडी विकून नातीला दिल्लीला शिकण्यासाठी पाठवले

मुंबईमध्ये ऑटो चालवणाऱ्या देशराज यांची गोष्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. देशराज यांनी आपल्या नातीला शिवण्यासाठी आपले घर विकले. सोशल मीडियामध्ये त्यांची गोष्ट व्हायरल झाल्यानंतर क्राउड फंडिंगद्वारे अनेकांनी पैसे दिले आणि पाहता-पाहता तब्बल 24 लाख रुपये जमा झाले.

याबाबत सविस्त माहिती अशी की, देशराज यांना दोन मुले होती. पहिला मुलगा घरातून निघून गेला होता, काही दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला. यानंतर काही दिवसातच दुसऱ्या मुलाने आत्महत्या केली. दोन्ही मुलांच्या जाण्याने देशराज यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. देशराज यांच्या कुटुंबात पत्नी, सून आणि चार नातवंड आहेत. या सर्वांचे पोट भरण्यासाठी देशराज ऑटो चालवतात.

झोपडी विकून नातीला दिल्लीला शिकण्यासाठी पाठवले

देशराज यांच्या मोठ्या नातीने इंटरमीडिएटमध्ये 80 टक्के मिळवले होते. यानंतर त्यांच्या नातीने दिल्लीतील एका कॉलेजमध्ये बीएड करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला पाठवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी आपली झोपडी 1 लाख रुपयांना विकली. ज्या दिवशी नातीचा रिझल्ट आला होता, त्या दिवसी त्यांनी सर्व प्रवाशांना मोफत ऑटोत सोडले होते.

नातवांना गावात शिकवत आहेत

देशराज सांगतात की, त्यांनी आपल्या नातवंडांना शिक्षणाचे महत्व सांगितले. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व नातवंडांना चांगले शिक्षण देण्याचा निश्चय केला आहे. पण, नातवांच्या शिक्षणावर खर्च करण्याइतके पैसे देशराज यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला गावाला पाठवले. तेथील एका शाळेत सर्व नातू शिक्षण घेत आहेत. देशराज यांच्या परिस्थितीमुळे शाळेने त्यांची पूर्ण फी माफ केली.

लॉकडाउनमुळे कमाई कमी झाली

एका इंटरव्ह्यमध्ये त्यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे कमाईवर खूप परिणाम झाला. आधी दिवसाला 700-800 कमाई व्हायची, पण आता 300-400 होते. महिन्याकाढी 10-12 हजारांची कमाई होते आणि त्यातील काही रक्कम नातीला पाठवतो.

फुटपाथवरील लोकांना देतात पैसे

देशराज यांनी सांगितले की, 1958 मध्ये ते मुंबईत आल् होते. 10वी पर्यंतचे शिक्षण इथेच घेतले. 1985 रिक्षा चालवणे सुरू केले. मागील एका वर्षापासून देशराज आपल्या ऑटोमध्येच राहतात. पण, देशराज खूप दिलदार आहेत. ते सांगतात की, कधी-कधी जास्त कमाई झाल्यावर फुटपाथवरील लोकांना पैसे देतो. इतर ऑटोवाले देशराज यांची खूप इज्जत करतात.

बातम्या आणखी आहेत...