आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ajit Pawar And Devendra Fadanvis Meeting Deogiri Banglo | Mumbai Latets Update | This Friendship Should Not Be Broken...Deputy Chief Minister's 'Devagiri' Bungalow Awarded To Opposition Leader

दिव्‍य मराठी विशेष:ही दोस्ती तुटायची नाय... उपमुख्यमंत्र्यांचा ‘देवगिरी’बंगला विरोधी पक्षनेत्याला बहाल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मित्राला जीवनात कायम सर्वोच्च स्थान असते, मग ते राजकारण असो वा खासगी आयुष्य. विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक असले तरीही खासगी आयुष्यात मैत्री जपली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे- शरद पवार, विलासराव देशमुख ते गोपीनाथ मुंडे ते आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार अशी परंपरा आहे.

सत्ता गेल्यानंतर मंत्र्यांना शासकीय घर रिकामे करावे लागते. पण गेली अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते बनले. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती. मंगळवारी तसा शासन निर्णय झाला आहे.

अजित पवार यांची विनंती फडणवीस यांच्याकडून मान्य
१. देवगिरी बंगला उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ मंत्र्यांना दिला जातो. हा विरोधी पक्षनेत्यास देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र यापुढे तो पायंडा पडणार नाही या अटीवर निर्णय झाल्याचे निर्णयात म्हटले आहे.
२. ठाकरे सरकार २०१९ मध्ये बनले तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचे कार्यालय व मुलीच्या शाळेची साेय म्हणून जवळचा सागर बंगला मिळावा, अशी मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...