आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतर:“ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारीच’ ; शिंदे गटाच्या आमदारांची गद्दार म्हणून अवहेलना

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कौल दिला नव्हता. बाळासाहेबांनी कधीही सत्तेची इच्छा बोलून दाखवली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा कधीही मंत्री झालेला नाही. पण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडले. एकाच घरात मुख्यमंत्री आणि मंत्री होते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. पण इथे तुम्हीच घरात मंत्रिपदे घेतली. हे बाळासाहेबांना तरी पटले असते का? बाळासाहेबांच्या विचारांशी ही गद्दारीच नाही का, अशी टीका शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांची गद्दार म्हणून अवहेलना करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत.

बातम्या आणखी आहेत...