आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावज्रमूठ म्हणजे चांगले लोक एकत्र येतात. मविआची वज्रमूठ नव्हे, तर वज्रझूट आहे. हे खोटारडे लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत. ‘तीन तिघाडा अन् काम बिघाडा’ अशी त्यांची स्थिती झाली आहे. आम्ही विचारांसाठी एकत्र आलो आहोत. सत्तेसाठी त्यांनी विचार बाजूला ठेवले. महाविकास आघाडीकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिंदे म्हणाले, सावरकरांचा अपमान म्हणजे स्वातंत्र्यवीर, देशभक्तांचा अपमान आहे. देशासाठी शहीद झालेल्यांचा आणि तमाम देशवासीयांचा अपमान आहे. सावरकर यात्रेत हजारो देशभक्त सहभागी होत आहेत. सावरकरांचा अपमान मणिशंकर अय्यर यांनी केला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जोडा हातात घेत जोडे मारो आंदोलन केले होते. त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.सभा घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणे व त्यांच्यासोबत बसणे हे चूक आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. त्यांचा निषेध करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहेत का, असा सवाल शिंदे यांनी केला.
९ एप्रिलला अयोध्या दौरा
प्रभू रामचंद्र आमच्या अस्मितेचा विषय असून ९ एप्रिलला आम्ही अयोध्येला जात आहोत. शरयू नदीवर आरती करणार आहोत. बाळासाहेबांचे आणि तमाम रामभक्तांचे अयोध्येत भव्य राममंदिर तयार व्हावे हे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.