आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा तर लोकशाहीचा खून!:विरोधकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर सत्ताधाऱ्यांवर भडकल्या

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेला एकूणच प्रकार चुकीचा आहे. लोकशाहीचा-संविधानाचा याठिकाणी खून सुरू आहे. विरोधकांना संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला आहे. विरोधकांचा तो आवाज तुम्ही अशाप्रकारे दाबू शकत नाही. अशी संतप्त प्रतिक्रीया माजी मंत्री काँग्रेस आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. यावरुन वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रीया उमटतांना दिसत आहेत. अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या घोषणा झोंबल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झाले आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत. काँग्रेसकडूनही याबाबत प्रतिक्रीया आली आहे.

विरोधकांना धमकावण्याचे काम सुरू

विरोधकांवर निशाणा साधताना ठाकूर म्हणाल्या, ही संवैधानिक जागा आहे. याठिकाणी कायदे-सुव्यवस्था आपण बनवत असतो. मात्र विरोधकांना याठिकाणी धमकावणे सुरू आहे. आज महाविकास तोडण्याचा जो प्रकार झाला. तो ईडी-सीबीआयच्या बळावर झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंत असा प्रकार घडलेला नाही. मात्र आता जर हा प्रकार घडतोय तर यापाठीमागे मोठा उद्रेक आहे. हा उद्रेक उद्या जनतेतही जाऊ शकतो.

पायऱ्यांवर आंदोलनही सत्ताधारीच करतील का?

हा जो शिंदे गट आहे ते शिवसेना नाही. शिवसेना आमच्यासोबत आहे. हा जो गट आहे तो संवैधानिक आहे की नाही याचा निकाल लागलेला नाही. संविधानाचा, लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार याठिकाणी सुरु आहे. विरोधकांनी बोलूच नये का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पायऱ्यांवर बसून आंदोलनही सत्ताधारीच करतील का? आता तेवढाही अधिकार विरोधकांना राहिलेला नाही का असा खोचक सवाल त्यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...