आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या उपाध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. शिंदे गटासाठी हे दिलासादायक मानला जात आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याचे ट्विट केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत आमदारांच्या अपात्रतेवर आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने शिंदे गट, महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या उपाध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.
शिवसेनेला डिवचले
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र भवन, उपाध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी आणि केंद्रालाही नोटीस बजावली आहे. न्यायालयाने सर्व आमदारांना सुरक्षा पुरवण्याचे आणि यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निकाल येईपर्यंत फ्लोअर टेस्ट होणार नसल्याचे सांगितले. उपाध्यक्षांना 15 दिवसांत उत्तर सादर करायचे आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. आज झालेली सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळाला असल्याने शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे नावाचा उल्लेख करीत पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे.
एकनाथ शिंदेंचे ट्विट
निवासस्थानसमोर फटाके फोडले
एकनाथ शिंदे गटाला आज सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच आज एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर फटाके फोडण्यात आले व आनंद साजरा करण्यात आला आहे.
देसाईंचा व्हिडीओ केला ट्वीट
एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याच्या पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा एक व्हिडिओ ट्विट केला. यात शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले आहे. मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, अशा संतप्त भावना या व्हिडिओद्वारे त्यांनी मांडल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.