आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रबोधनकारांच्या पुरोगामी स्टाइल’ने उत्तर देण्यासाठी हा प्रयत्न:यंदा संभाजी ब्रिगेड करणार प्रबोधनकारांची जयंती साजरी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्यानंतर ब्रिगेडने येत्या १७ तारखेला प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येणार आहे, असे ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस यांच्या धार्मिक राजकारणाला शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड मिळून ‘प्रबोधनकारांच्या पुरोगामी स्टाइल’ने उत्तर देण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्याची घोषणा नुकतीच केली आहे. प्रादेशिक पक्षांना संपवून टाकण्याची ईर्षा मनी बाळगून असलेल्यांना शह देण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे संभाजी ब्रिगेडने त्या वेळी जाहीर केले होते. प्रबोधनकारांच्या विचारानेच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे संकटात असताना आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.

संभाजी ब्रिगेडचा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शक्तिप्रदर्शन करणार आहे. यानिमित्ताने प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम होणार आहे. राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होईल. ठिकठिकाणी प्रबोधनकारांच्या पुस्तकांचे वाटप होईल. त्यानिमित्ताने शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्र येतील.

बातम्या आणखी आहेत...