आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:यंदा पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया 10 ते 25 ऑगस्टदरम्यान होणार, ई-स्क्रुटिनीची संकल्पना राबवण्यात येणार

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरीलपैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धतीसोबतच ई-स्क्रुटिनीची संकल्पना राबवण्यात येणार आहे.