आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:विदेशातून येणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण अचानक वाढले. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. महानगरपालिकेने शहरातील २ रुग्णालयांसह ३ ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर परदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणीही केली जाणार आहे.

मुंबईत कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या धर्तीवर मुंबई महापालिकेने आढावा बैठक घेतली. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईत दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक केली. कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या दरात ५ टक्क्यांनी वाढ झाली. डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.