आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अजान' प्रकरण:शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे असे म्हणणाऱ्यांनी हा तमाशा बंद करावा, संजय राऊतांनी भाजपला सुनावले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा.

'अजान' स्पर्धेवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या 'अजान' स्पर्धेच्या वक्तव्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. तसेच या मुद्यावरून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याचे भाजप सांगत आहेत. आता या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी भाजपचा समाचार घेतला आहे. प्रसार माध्यमांसी राऊत बोलत होते.

'महाराष्ट्रातील भाजपा नेते 'अजान' वरून राजकारण करत आहेत. दरम्यान कोरोना काळात धार्मिकस्थळांवर गर्दी होऊ नये, असे पंतप्रधानांनीही सांगितले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे असे जे म्हणत आहेत त्यांनी हा तमाशा बंद करावा. बेरोजगारी, जीडीपी अशा मुद्यांवर त्यांनी बोलायला हवे.' असे म्हणत संजय राऊतांनी भाजपच्या नेत्यांना सुनावले आहे.

यासोबतच शिवसेनेचे मुखपत्र सामनामधूनही शिवसेनेने अजानच्या मुद्द्यावरुन भाजपवर भाष्य केले आहे. 'शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा' असे म्हणत शिवसेने आरोप केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser