आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ''भाडोत्री भाजपवाले माझे वक्तव्य वादग्रस्त बनवत आहे; पण ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली ते कुणीही सुटणार नाहीत. लवकरच त्यांच्यावर कायदेशिर मार्गाने कारवाई होणार आहे.'' असा इशारा राऊत यांनी बंडखोरांना दिला.
भाषण नीट समजून घ्या
संजय राऊत म्हणाले, माझे भाषण नीट समजून घ्या. चाळीस व्यक्ती गुवाहाटीत बसले मजा करीत आहेत.गुवाहाटीत आमदार उड्या मारीत आहेत पण ती जिवंत प्रेतं आहेत, त्यांचा आत्मा मेलेला आहे, असे मी म्हणालो. मग त्यांचे पोस्ट मार्टम विधानसभेत करावे लागेल असेच मी म्हणालो याला हे वादग्रस्त कोण बनवतेय ते भाडोत्री भाजपवाले आहेत.
आमचा आत्मा बाळासाहेब ठाकरे
संजय राऊत म्हणाले, आम्ही आणि आमचे कुटुंब मरु पण आमचा आत्मा बाळासाहेब ठाकरे आहेत, जे कुणी माझ्या वक्तव्याचा विपर्यास काढीत आहेत त्यांना तो काढु द्या असे म्हणत राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम राहीले.
सूरतला काय जादूटोणा आहे?
पवार म्हणाले, सर्वच बंडखोर आमदार, मंत्री सूरतवरुन गुवाहाटीला जात आहेत याबाबत राऊत म्हणाले की, सूरतला काय जादुटोणा आहे, कोणती काळी जादु केली हे पाहावे लागेल. गुवाहाटीत जायला मुंबईहून जाता येते पण सूरतमधूनच का? सूरतला असे काय आहे तर तिथे भाजपची या बंडखोरांना फूस असल्याकडेच त्यांचा रोख होता.
भाजपसमोर नाक घासावे लागतेय
राऊत म्हणाले, बंडखोरांना कुणापुढे गुढघे टेकावे लागतात. कुणापुढे नाक घासावे लागतात. सूरतला व्यवहार होतो ना. मुंबईतून तेथे फाटकी नोट घेऊन जावे लागते. कुणाला मंत्रीपद द्यायचे, कुणाला काय द्यायचे हे ठरते.
बंडखोर आमदारांची गुलामी
राऊत यांनी टीका केली की, बंडखोरांना भाजपची गुलामी करावी लागत आहे. एवढी गुलामी राज्यातील आमदारांनी गेल्या साठ वर्षात पाहिली नाही. शिवसेनेचे आमदार स्वतःला म्हणता पण शिवाजी महाराजांनी सूरत लुटली आता बंडखोर आमदार मात्र सूरतेत झुकत आहेत.
बंडखोरांच्या मानेवर जोखड
राऊतांनी टीका केली की, शिवसेनेतील बंडखोरांच्या मानेवर जोखड ठेवले आहे. आमच्याही ठेवले होते पण सर्वच आमच्यासारखे नसतात आम्ही झुगारले. लोकांच्या मनात जे आहे ते लवकरच होणार आहे. मंत्र्यांवर कारवाई होणार आहे, आम्ही पाऊले व्यवस्थित टाकीत आहोत.
बेईमानांना सोडणार नाही
ज्यांनी ज्यांनी शिवसेनेची बेईमानी केली आहे त्यांना सोडणार नाही. ते जरी गेले तरी शेवटपर्यंत आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहोत, असेही राऊतांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.