आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:दलित अत्याचाराविरुद्ध ‘ब्र’ न उच्चारणाऱ्यांनी शिकवू नये; रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना फटकारले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रामदास आठवले भाजपच्या गटात गेल्याने शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोग संपल्यात जमा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ‘ब्र’सुद्धा काढला नाही. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो असून दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर मूग गिळून बसणाऱ्या राऊतांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी राऊत यांना फटकारले.

हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नट्यांच्या घोळक्यात होते, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले, संजय राऊत हे नट्यांच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. हाथरसच्या घटनेची माहिती मिळताच मी तीव्र निषेध केला होता.

शिवशक्ती-भीमशक्ती संपुष्टात

आठवले यांनीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आग्रह करत शिवशक्ती-भीमशक्तीचे समीकरण घडवून आणले हाेते. परंतु आता आठवले भाजपच्या गटात गेल्याने तो प्रयोग संपल्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser