आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत नोकरदार, विद्यार्थी, महिला, कामगार, मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यांना गुरुवारपासून १० हजार एसटी बसेसच्या माध्यमातून घरी पाठवले जाणार आहे. यासाठी सुमारे २० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. संचारबंदीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हजारो लोक अडकले आहेत. त्यांना स्वत:च्या जिल्ह्यांत जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई, पुण्यासह सर्व जिल्ह्यांत अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाइकांकडे गेलेल्या सर्वच लोकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून एसटी बसेसमार्फत ही मोफत सेवा दिली जाणार आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्य परिवहन महामंडळाला २० कोटींच्या आसपास निधी उपलब्ध करून देणार आहोत. तसेच यासाठी आणखी खर्च लागला तरी तो देण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
प्रवासाआधी वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार
विशेष म्हणजे, कोरोनासाठीची आवश्यक चाचणी करूनच नागरिकांना पुढच्या प्रवासाला जाता येणार आहे. या प्रवासासाठी सरकारकडून नियमावलीही जारी करण्यात येणार आहे
.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.