आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना 30 जूनला दाखवला:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार शरद पवारांना प्रत्युत्तर

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मविश्वासाला धक्का लागलेली व्यक्ती ज्योतिषाकडे जाते, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्याला जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता.२४) दिले.’ आत्मविश्वास होता म्हणूनच ५० आमदारासह १३ खासदार माझ्यासोबत आले. ३० जूनला ज्यांना दाखवायचा होता त्यांना मी दाखवला आहे, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांच्यावर पलटवार केला.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर हे सरकार स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही मंदिरात जाण्याचा आम्हाला अडथळा वाटत नाही. आम्ही जे काही करतो ते उघडपणे करतो. दिवसाढवळ्या करतो, काही लोक लपून छपून करतात असे ते म्हणाले. मी कामाख्या देवीच्या दर्शनाला गुहावटीला जाणार आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे भाजप-शिवसेना सरकार काम करत आहे. त्यामुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोलादेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

सीमावर्ती भागात गेल्या अडीच वर्षात ज्या विकास कामांच्या योजना बंद झाल्या होत्या, त्या आम्ही पुन्हा सुरु केल्या. सीमावर्ती भागातील मराठी माणसाला न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठे जाऊ देणार नाही. त्यासाठी हवा तो संघर्ष करायला तयार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावले.

बातम्या आणखी आहेत...