आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यभरात 6 हजार 686 कोरोनाबाधितांची नोंद, 5 हजार 861 जण कोरोनामुक्त, 158 जणांचा मृत्यू

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात शुक्रवारी 6 हजार 686 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहेत. तर 158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 एवढे झाले आहे. तसेच राज्यातील मृत्यू दर सध्या 2.11 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत 4 कोटी 79 लाख 38 हजार 354 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

या विभागांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद
राज्यातील मुंबई, रायगड, अहमदनगर, पुणे, पुणे पालिका, पिपरी चिंचवड पालिका, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या विभागांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...