आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दहशतवादी घुसणार:मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; हाजीअली दर्गा टार्गेटवर, पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत सतरा दहशतवादी घुसतील. ते हाजीअली दर्ग्यावर हल्ला करतील, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडालीय. या फोननंतर पोलिसांच्या तुकडीने तातडीने हाजीअली दर्ग्याकडे मोर्चा वळवत तपासणी केली. मात्र, हाती काही लागले नाही.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेला फोन उल्हासनगरमधून आल्याचे समजते. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला काल फोन आला. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी तातडीने हाजी अली दर्ग्याचा परिसर पिंजून काढला. एल अँड टीच्या प्रोजक्ट साइटच्या भागाची टेहळणी केली. मात्र, कुठेही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पोलिसांनी दक्षता म्हणून आपली तपास मोहीम सुरू ठेवलीय.

'तो' नंबर बंद

पोलिसांना ज्या नंबरवरून फोन आला होता, त्या नंबर त्यांनी पुन्हा संपर्क साधला. मात्र, तो फोन बंद असल्याचे समजते. हा फोन उल्हासनगर येथून केल्याचे समोर आले आहे. हा फोन कोण केला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यापू्र्वीही मुंबईत हल्ला करण्याची धमकी देण्याचे फोन आलेले आहेत. शिवाय मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला. या जुन्या आठवणी भयावह आहेत. हे पाहता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...