आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्याची नोंद:बायको कार्यकर्त्यासोबत पळाल्याने पवारांना धमकी ; नारायणला पाटण्यातून मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नारायणकुमार सोनी या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. नारायणकुमार सोनी हा गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ येथे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या फोनद्वारे धमक्या देत होता.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी शरद पवार यांच्यावर रागावला होता. कारण त्याची पत्नी एका कार्यकर्त्यासोबत पळून गेली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी मध्यस्थी करावी, अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे त्याने थेट शरद पवार यांना धमकी दिली. नारायण सोनी (४५) याला मंगळवारी पाटणा येथून अटक केली. माहितीनुसार, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही.

४ महिन्यांपासून फोन सुरू होते आरोपी नारायण सोनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी सतत फोन करत होता आणि तो खालच्या भाषेत बोलत होता. मात्र या वेळी त्याने शरद पवार यांना ‘मुंबई आके देसी कट्टे से उडा दूंगा’, अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपीविरोधात २९४ आणि ५०६(२) (गुन्हेगारी धमकी) यासह संबंधित कलम अंतर्गत गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...