आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मंत्रालयात पोलिसाला दिली धमकी; आ. संतोष बांगर यांच्यावर कारवाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे(शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात सापडले आहेत. मंत्रालय सुरक्षेवर असलेल्या पोलिस शिपायाला गुरुवारी (३ नोव्हेंबर) धमकी दिल्या प्रकरणाचा अहवाल गृह खात्याच्या वरिष्ठांना पाठवण्यात आल्याने बांगर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांची वर्षा निवासस्थानी जोरदार कानउघडणी केल्याचे समजते.

आमदार बांगर पंचवीस समर्थकांसह गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करत असताना तेथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले. सोबतच्या कार्यकर्त्यांनी पास काढावा, अशी सूचना पोलिस शिपायाने केली होती. त्यामुळे संतापलेल्या बांगर यांनी शिवीगाळ केली. “माझ्याकडे पिस्तूल असते, तर तुम्हाला गोळ्या घातल्या असत्या,” अशी धमकीही त्यांनी दिल्याचे समजते. याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मंत्रालय पोलिस नियंत्रण कक्षाच्या दैनंदिन डायरीमध्ये याबाबत रात्री नोंद केली. या नोंदीचे पडसाद आज दिवसभर मंत्रालयात उमटले. बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना यापूर्वी अनेकदा दमदाटीचे प्रकार केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...