आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत पुन्हा ड्रग्स पकडली:दोन कोटींच्या चरससह तीन जणांना अटक, आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारीही मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि आरपीएफ यांनी कारवाई करत दोन लोकांना चरससह अटक केली होती.

कुर्ला एलटीटी रेल्वे टर्मिनसमधून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रविवारी दोन पुरुष आणि एका महिलेला दोन कोटी रुपयांच्या चरससह अटक केली. आफताब शेख (वय 28), साबिर सय्यद अली (30) आणि शमीम बानो( 30) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुप्त सूचना मिळाल्यानंतर यांना पकडम्यात आले. यांच्याजवळून 6.628 किलोग्राम कश्मीरी चरस हस्तगत करण्यात आले आहे.

एनसीबी चीफ समी वानखेडे यांनी सांगितले, 'तिघेही कुर्ला ईस्ट येथील रहिवासी आहेत. हस्तगत केलेले मादक पदार्श कश्मीरी चरस आहे.. तिन्ही आरोपींवर अशा प्रकारच्या अपराधांमध्ये यापूर्वीही सहभागी असल्याचा संशय आहे' त्यांनी म्हटले की, आरोपींना सोमवारी कोर्टात हजर केले जाईल.

दोन जणांना चरससह पकडले गेले
रविवारीही मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि आरपीएफ यांनी कारवाई करत दोन लोकांना चरससह अटक केली होती. चरससह पकडलेले दोन्ही आरोपी दिल्लीच्या निजामुद्दीनहून मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होते आणि तपासादरम्यान संशयास्पद पदार्थ सापडल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser