आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:जन्मतः तीन ब्लॉक; 6 दिवसांच्या चिमुरडीला आदित्य ठाकरे यांची वाढदिवशीच आर्थिक मदत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘असाच चमकत राहा’; दिशा पटनीच्या टि्वटने चर्चा

रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या एका सहा दिवसांच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे. या मदतीमुळे त्या मुलीवर शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी आदित्य यांचा वाढदिवस आहे. कोरोनामुळे त्यांनी तो साजरा न करण्याचे आवाहन केले होते. याच दिवशी त्यांनी ही मदत केली आहे.

मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात आरजू अन्सारी ही अवघ्या सहा दिवसांची चिमुरडी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या हृदयात जन्मतः तीन ब्लॉक आहेत. या आजारावर मात करण्यासाठी तिच्यावर तत्काळ हृदय शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. परंतु तिच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तिच्या उपचारासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैसे लागणार होते. नातेवाइकांचीही साथ मिळाली नाही. ही बाब समजल्यावर आदित्य ठाकरे यांनी आरजूच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली. आता या चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरजू हिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचे आभार मानले.

‘असाच चमकत राहा’; दिशा पटनीच्या टि्वटने चर्चा

आदित्य ठाकरेंवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीनेही शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, असाच चमकत राहा,’ असे ट्विट दिशाने केले आहे. आदित्य यांच्यासोबतच आजच दिशा पटानीचाही वाढदिवस आहे. दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीबद्दल नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. या दोघांच्या ‘डेट’विषयी मध्ये चर्चा होती. दिशाने “मित्रांसोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? मित्रांची निवड करताना मी स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही,’ असे उत्तर दिले होते.

0