आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील वाहतूक कोंडी:मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात, अमृता फडणवीस यांचा दावा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील वाहतूक कोंडी ही सर्वांसाठी काही नवीन नाही. तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा हे नेहमीच चित्र असते. मात्र आता अमृता फडणवीस यांनी वेगळाच दावा केला आहे. मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे तीन टक्के घटस्फोट होतात. लोक वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना द्यायला वेळच मिळत नाही, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

पहिली गोष्ट ही आहे की महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कोणावरही व्हायला नको, दुसरे राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. मात्र, ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर कोणीही अजिबात कमेंट करू नये. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतेही कामे जमत नसल्याचे आपण पाहतो. मेट्रोचे काम सुद्धा तसेच पडून आहे. मी हे सगळे सामान्य माणूस म्हणून बोलत आहे. जिथे गरज आहे, तिथे राज्य सरकारने लक्ष द्यावे. भाजप आणि आरएसएसचे लोक महिलांचा अधिक सन्मान करतात. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के घटस्फोट होतात, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावे असे मी म्हणेन.'

भाजप आणि आरएसएस पुरोगामी आहे. स्त्रियांचा मान, सन्मान ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे आणि ते पार पाडतात. मी आरएसएस आणि भाजपच्या खूप जवळची आहे. मी राजकीय व्यक्ती नाही, मी तु्हाला एका शब्दात सांगू शकते की स्त्रियांचा सर्वाधिक कुणी आदर करत असेल तर आरएसएस करते असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...