आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:'मातोश्री' बाहेरील 3 पोलिस आढळले कोरोना पॉझिटिव्ह, राज्यभरातील 300 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाने पोलिस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री बाहेरील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या तीनही पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. या तिघांनाही सांताक्रूझमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आलेली नव्हती. मात्र खबरदारी म्हणून कला नगर परिसरातील सर्व पोलिसांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सर्व पोलिसांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना खबरदारी म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान चहावाला बरा होऊन नुकताच परतला आहे. मात्र आता 'मातोश्री'बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

राज्यभरातील 300 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा

राज्यभरात 342 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 290 पोलिसांवर उपचार सुरु असून 49 जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोना लागण झालेल्यांमध्ये 30 अधिकारी आणि 197 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापैकी 8 पोलीस अधिकारी आणि 22 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...